Nanded : जात प्रमाणपत्र द्या अन्यथा,आमची मुलबाळं सांभाळा, जात प्रमाणपत्रासाठी आदिवासी समाज आक्रमक
नांदेडमधील आदिवासी समाज जात प्रमाणपत्रासाठी समाज आक्रमक झालाय... आणि त्यासाठी त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात आंदोलन करत ठिय्या आंदोलन केलंय... "जात प्रमाणपत्र द्या अन्यथा, आमची मुलबाळं तुम्हीच सांभाळा" अशी भूमिका अदिवासी समाजाने घेतलीय... या आंदोलनात शेकडो अदिवासी महिला-पुरुष मुलाबाळांसह सहभागी झालेत. जात प्रमाणपत्रासाठी अधिकाऱ्यांकडून अडवणूक केली जाते आणि पैशांची मागणी केली जाते, असा गंभीर आरोपही त्यांनी केलाय...