Aditya Thackeray यांची गोरेगावमध्ये शिवगर्जना सभा, सभेसाठी जय्यत तयारी सुरु : ABP Majha
ठाकरे गटाकडून शिवसेना नाव आणि धनुष्यबाण चिन्ह गेल्यानंतर ठाकरे गटाने तळागाळातील कार्यकर्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी शिवगर्जना अभियान सुरू केले आहे. या अभियानानुसार आज गोरेगावमध्ये आदित्य ठाकरे यांची शिवगर्जना सभा होणार आहे... छत्रपती संभाजी महाराज मैदानावर सायंकाळी 6 वाजता ही सभा आयोजित करण्यात आली आहे. या सभेची जय्यत तयारी करण्यात आली आहे...