Aditya Thackeray Pune Flood : ठाकरेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी; काय आश्वसन दिलं? सरकारवर टीका

Continues below advertisement

Aditya Thackeray Pune Flood : ठाकरेंकडून पूरग्रस्त भागाची पाहणी; काय आश्वसन दिलं? सरकारवर टीका

आदित्य ठाकरे पुणे श्रमिक पत्रकार संघात आले आहेत. पुण्यातील पर्यावरण अभ्यासक सारंग यादवडकर नदीकाठी सुरू असलेल्या नदी काठ विकास प्रकल्पाविषयी presentation देत आहे. या प्रकल्पामुळे नदीची वहनक्षमता कमी झाली असून हा प्रकल्प पूर येण्यास कारणीभूत ठरत असल्याचं या सादरीकरणात नमूद करण्यात आलंय. आदित्य ठाकरे हा विषय समजून घेत आहेत.  आदित्य ठाकरे  आम्ही विकासाच्या विरोधात आहोत अशी टीका होते. आम्ही विकासाच्या विरोधात नाही. मात्र त्यातील धोके अशी समजून घेतले पाहिजे.  त्यासाठी या प्रकल्पाला मी पर्यावरण मंत्री असताना स्थगिती दिली होती. साबरमती प्रकल्प चांगला झाला असेल कदाचित. पण साबरमती आणि पुण्यात फरक आहे  कंत्राटदार काम करून जातील. पूर आला तर तुम्हा आम्हाला भोगावा लागणार. नदी आदी रुंद आणि नंतर खोल करावी लागते. मात्र इथे नदी अरुंद केली जातेय आणि खोली पण कमी होत आहे. मी नुसताच पाहणी दौरा करून जाणार नाही.  

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram