Aditya Thackeray on MNS Shiv Sena : स्वच्छ दिलाने एकत्र येण्याचा विचार; मनसेसोबतच्या युतीवर वक्तव्य
Aditya Thackeray on MNS Shiv Sena : स्वच्छ दिलाने एकत्र येण्याचा विचार; मनसेसोबतच्या युतीवर वक्तव्य
आदित्य ठाकरे भाषण पॉइंटर - सरकार असताना छत्रपती संभाजीनगरमधे अनेक विकासकामे केली आहेत. आणि त्याच शहरात आज पाण्यासाठी गेल्या एक दीड महिन्यापासून आंदोलन सुरू आहे. - मी यापुढेच आंदोलनासाठी येणार होतो मात्र अंबादास दानवे यांनी मला शेवटच्या दिवशी मोर्चाला यावे म्हणाले. आणि मी आज आलो - आम्ही काय पाप केले हे मुख्यमंत्री सांगत नाही तो पर्यंत हे आंदोलन थांबणार नाही... - आदित्य ठाकरे कडून फडणवीसांची मिमिक्री.. - फडणवीस साहेब ओरडून चालत नाही, तुमच्यात हिंमत असेल तर काम करून दाखवा.. काम करण्याची हिंमत ही उद्धव ठाकरेमधे होती. - मंत्री शिरसाठ यांना उद्देशून काही काही लोकांनी कुठे कुठे हात मारले ७२ व्या मजल्यावर घर घेतली... - मेरे पास महाराष्ट्र की जनता आहे. (हिंदीत डायलॉग) - फक्त आरोप केले नाही , काम केले आहे. मी मंत्री असताना अजंता एलोरा साठी भरीव निधी दिला... - फडणवीस साहेब तुमच्याशी मंत्री भांडत आहेत. तुम्हाला व्यस्त ठेवलेले आहे. त्यातून थोड लक्ष बाहेर काढा आणि लक्ष द्या.... - पोलिसांना मोकळीक द्या एका दिवसात गुंडगिरी पोलिस संपतील. फडणवीस साहेब तुम्ही या चक्रातून बाहेर पडा. - फडणवीस साहेब धर्माचा चष्मा बाजूला ठेवून माणसाला माणूस म्हणून बघा.. कदाचित चष्मा नंबर वाढलं असेल डोळ्याची तपासणी करा... - येथे महिला आल्या आहेत कदाचित महिलांनी लाडकी बहीण म्हणून मतदान केले असेल .... - मी महिलाना विचारतो चांगली योजना सुरू आहे का? - जे एक मुख्यमंत्री आणि दोन उप मुख्यमंत्री राखी बांधायला आले आणि बहिणीची राखरांगोळी केली. - हे भाऊ नाही, भाव खाऊ आहेत.१५०० एवजी २१०० मिळतील वाटले होते मात्र ५०० रुपये केले. - यांनी सांगितले होते अर्जमुक्ती करू आणि दादा म्हणतात मी कधी आश्वासन दिले नाही... - हे आमदार खासदार येतील त्यांना विचारा पाणी कधी देणार म्हणून... - तुमच्या पालकमंत्रीला कसे भेटणार.. ते ७२ व्या मजल्यावर राहता..(हिंदी गाणे) उचि है बिल्डिंग लिफ्ट तेरी बंद है, कैसे मैं आऊ दिल रजामंद है.. - खासदार भुमरे यांना उद्देशून.. यांच्याकडे पाणी मागायला गेले तर हे पाणी एवजी दारू देतील.... - हे आंदोलन जनतेच्या हिताचं आंदोलन आहे. - छत्रपती संभाजीनगर शहर उद्योग आणि पर्यटकांच्या दृष्टीने महत्वाचं आहे. - तालुक्या तालुक्यात भांडण सुरू झाले आहे. धर्माच्या जातीच्या नावावर भांडण लावली जात आहे. - भाजपला आम्ही लबाड म्हटलं न्हवत त्यांनी स्वतः त्यांच्या छाताडावर लबाड लिहून ठेवले.... - महाराष्ट्र बद्दल भाजपच्या मनात राग आहे. - ग्रामीण भागात जसा दुष्काळ जाहीर होतो, तसा छत्रपती संभाजीनगर शहरात दुष्काळ जाहीर करा...