Aditi Tatkare :कुणी कितीही म्हणलं तरी महिलांना 1500 रुपये मिळणारच,अदिती तटकरेंनी सुनावलं
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In AppAditi Tatkare :कुणी कितीही म्हणलं तरी महिलांना 1500 रुपये मिळणारच,अदिती तटकरेंनी सुनावलं
परभणीत महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांची पत्रकार परिषद
राज्यातील अडीच कोटी महिलांना आम्हाला लाडक्या बहिणी योजनेचा लाभ द्यायचा आहे
या योजनेच्या निधीमुळे इतर कोणत्याही योजनेवर परिणाम नाही
योजना लोकप्रिय होते म्हणून विरोधकांकडून योजनेचा अपप्रचार
राज्यातील तब्बल अडीच कोटी महिलांना मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ आम्हाला द्यायचा आहे त्या दृष्टीने आत्ता एक कोटी तीस लाख पात्र महिलांना दोन हप्ते मिळणार आहेत तसेच येत्या काळात अर्जही भरता येणार आहेत त्यामुळे आम्ही निश्चितच अडीच कोटी महिलांपर्यंत ही योजना पोहोचणार असल्याचे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले तसेच योजना चांगली असल्यामुळे विरोधक याचा अपप्रचार करत आहेत या योजनेच्या निधीमुळ कुठल्याही इतर योजनेच्या निधीवर परिणाम झाला नसल्याचेही आदिती तटकरे यांनी परभणीत पत्रकार परिषदेत स्पष्ट केला आहे.