Ladki Bahin Yojana : लाडक्या बहिणींना 2100 चा हफ्ता कधी मिळणार? Aditi Tatkare यांचं उत्तर ऐका..
राज्यातल्या सर्व लाडक्या बहिणींसाठी खूशखबर आहे... नवं सरकार कामाला लागल्यानंतर आता लाडक्या बहिणींचा महिन्याचा हफ्ता पुन्हा मिळू लागलाय. डिसेंबर महिन्याच्या हफ्त्याच्या वितरणाला आजपासून सुरुवात झालीय. निवडणुकीनंतर लाडकी बहीण योजना सुरू राहणार की नाही, यावरून बराच वादविवाद झाला होता. पण योजनेचे पैसे मिळू लागल्यानं लाडक्या बहिणींची चिंता मिटलीय. मात्र यापुढे नव्या लाडक्या बहिणींची नोंद होणार की नाही, याबाबत अजून निर्णय घेण्यात आलेला नाहीय, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. तसंच महायुती सरकार पुन्हा आल्यानंतर लाडक्या बहिणींचा हफ्ता दीड हजारांवरून एकवीसशे रुपये करण्याचं आश्वासन देण्यात आलं होतं. त्याबाबतचा निर्णय येत्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात घेतला जाण्याची शक्यता अदिती तटकरे यांनी व्यक्त केलीय.