फडणवीस सरकारच्या काळात झालेल्या 33 कोटी वृक्ष लागवडीची चौकशी होणार
भाजप सरकारच्या काळात राबवण्यात आलेली 33 कोटी वृक्ष लागवडीच्या योजनेची चौकशी करण्याची घोषणा आज विधानसभेत करण्यात आली. आता या योजनेची चौकशीसाठी विधिमंडळाची समिती स्थापन करण्याची वन राज्यमंत्री दत्ता भरणे यांची विधानसभेत घोषणा केली..