Adhir Ranjan Chowdhury Suspended : नरेंद्र मोदींचं निरव मोदींसह तुलना, अधीर रंजन चौधरींचं निलंबन

Continues below advertisement

Adhir Ranjan Chawdhary Suspension : काँग्रेस नेते अधिर रंजन चौधरी (Adhir Ranjan Chawdhary) यांचं निलंबन करण्यात आलं आहे. तसेच सरकारविरोधातील अविश्वासाचा प्रस्ताव फेटाळण्यात आला आहे. लोकसभेत आवाजी मतदान करुन सरकारविरोधातला अविश्वास प्रस्ताव फेटाळला आहे. सभागृहाचे कामकाज शुक्रवारपर्यंत तहकूब करण्यात आलं आहे.

अधीर रंजन चौधरी यांचं निलंबन

काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी यांचं 10 ऑगस्ट रोजी, गुरुवारी लोकसभेतून निलंबन करण्यात आलं आहे. या प्रकरणी विशेषाधिकार समित चौकशी करेल, त्यानंतर समितीचा अहवाल येईल अधीर रंजन चौधरी यांचं संसदेतून निलंबन करण्यात आलं आहे. संसदीय कामकाज मंत्री प्रल्हाद जोशी यांनी यावेळी म्हटलं की, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी प्रत्येक वेळी देश आणि सरकारची प्रतिमा खराब करण्याचा प्रयत्न करतात. आम्ही त्यावेळी त्यांच्याकडून माफीची मागणी केली होती. मात्र, त्यांनी माफी मागितली नाही. त्यांच्याविरोधातील प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे.  

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram