Ravina Tandon : अभिनेत्री रवीना टंडनला 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर
अभिनेत्री रवीना टंडनला 'पद्मश्री पुरस्कार' जाहीर झाला आहे. रवीनाने 1992 साली 'पत्थर के फूल' या सिनेमाच्या माध्यमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केलंय. या सिनेमातील भूमिकेसाठी तिला फिल्मफेअरचा सर्वोत्तम महिला पदार्पण पुरस्कार मिळाला होता. त्यानंतर परंपरा, जमाना दीवाना, अंदाज अपना अपना, बडे मियां छोटे मियां अशा अनेक सुपहिट चित्रपट रवीना टंडनने दिले आहेत. रवीनाला 2001 साली 'दमन' या सिनेमासाठी सर्वोत्तम अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. तसेच 2003 साली प्रेक्षकांच्या भेटीला आलेल्या 'सत्ता' या सिनेमातील अभिनयाचे समीक्षकांनी कौतुक केले आहे.
Tags :
Debut FILMFARE Zaheer BOLLYWOOD Actress Raveena Tandon Padma Shri Award Pathtar Ke Phool Best Female Debut Award