Priya Berde | अभिनेत्री प्रिया बेर्डे राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षात प्रवेश करणार
Continues below advertisement
अभिनेत्री प्रिया बेर्डे यांनी आपल्या अभिनय कौशल्याने महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनात वेगळी ओळख मिळवली. आता एक नवी इनिंग साकारण्यासाठी त्या सज्ज झाल्या आहेत. अभिनेत्री प्रिया बेर्डे आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाणार आहेत. काही दिवसांपासून त्या पक्षप्रवेश करणार असल्याबद्दल राष्ट्रवादीच्या गोटात चर्चा होती. परंतु प्रिया यांनी मात्र यावर पुरेपूर मौन साधलं होतं. शनिवारी (4 जुलै) सकाळी मात्र एबीपी माझाशी बोलताना त्यांनी या प्रवेशाला दुजोरा दिला आहे.
Continues below advertisement