Theatre Reopen : नाटक होणार पण निर्बंधांचं काय? कलाकार आणि दिग्दर्शक म्हणतात...
येत्या 22 ऑक्टोबरपासून नाट्यगृहं पुन्हा सुरु करण्यात येणार आहेत. पण त्यासाठी राज्य सरकारनं पन्नास टक्केच आसनक्षमतेची अट घातली आहे तर इतर काही सुचना ही सरकारकडूल देण्यात आल्या आहेत. रंगकर्मी आणि प्रेक्षकांचा उत्साह नक्कीच शिगेला पोहोचला आहे परंतु 50 टक्के आसनक्षमतेच्या अटीमुळं नाट्यवर्तुळात साहजिकच नाराजीची भावना आहे.