Pandit Ramdas Kamat Passed Away : ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत कालवश!

Continues below advertisement

Pandit Ramdas Kamat Passed Away : रंगभूमीवरील सुवर्णयुगाचे साक्षीदार आणि ज्येष्ठ गायक, अभिनेते पंडित रामदास कामत यांचं शनिवारी रात्री विलेपार्ले इथल्या त्यांच्या निवासस्थानी वृध्दापकाळानं निधन झालं. ते 90 वर्षांचे होते. पंडित रामदास कामत यांनी धि गोवा हिंदू असोसिएशनच्या 'संगीत संशय कल्लोळ' या नाटकाने आपल्या संगीत रंगभूमीवरील कारकिर्दीची सुरुवात केली होती. त्यानंतर त्यांनी अठरा संगीत नाटकांमधून काम केले होते. त्यांच्या पश्चात मुलगा डॉ. कौस्तुभ कामत, सून डॉ. संध्या कामत, नातू अनिकेत, नातसून भव्या असा परिवार आहे. त्यांच्या पार्थिवावर अंधेरी येथील पारसीवाडा स्मशानभूमीत अंतिम संस्कार करण्यात येणार आहे.

मराठी रंगभूमीवरील संगीत नाटकांच्या सुवर्णयुगाचे साक्षीदार असलेले पंडित रामदास कामत हे मूळचे गोव्याचे. लहानपणीपासून वडिल बंधू उपेंद्र यांच्याकडून संगीताचे धडे गिरवणाऱ्या कामत यांनी नाट्यसंगीताचेही शिक्षण घेतले. पंडित गोविंद बुवा अग्नी, पंडित जितेंद्र अभिषेकी, पंडित भीमसेन जोशी यांच्याबरोबरच प्रभाकर पेंढारकर आणि भालचंद्र पेंढारकर यांच्या हाताखाली त्यांनी नाट्यसंगीत आणि अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. तर यशवंत देवांकडून त्यांनी भावगीत शिकून घेतले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram