BMC Elections: 'मी मोदीजींचा भक्त', अभिनेते Mahesh Kothare यांना विश्वास, मुंबई पालिकेवर कमळ फुलेल

Continues below advertisement
ज्येष्ठ चित्रपट अभिनेते, दिग्दर्शक आणि निर्माते महेश कोठारे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपचे कौतुक करत आगामी मुंबई महापालिका (BMC) निवडणुकीवर मोठे भाष्य केले आहे. 'मी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा भक्त आहे', असे विधान महेश कोठारे यांनी केले आहे. मुंबईतील मागाठाणे येथे एका दिवाळी पहाट कार्यक्रमात ते बोलत होते. 'भाजप म्हणजे आपलं घर आहे' असे सांगत त्यांनी भाजपला आपला पूर्ण पाठिंबा दर्शवला. पुढच्या वर्षी दिवाळीपर्यंत मुंबई महापालिकेवर भाजपचे कमळ फुललेले असेल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला. इतकेच नाही तर, या भागातून निवडून येणारा नगरसेवक पुढचा महापौर व्हावा, अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola