तुषार भोसलेंच्या दौऱ्यात कार्यकर्ते भडकले, भाजप, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांमध्ये धक्काबुक्की
Continues below advertisement
Pandharpur : पंढरपूरमध्ये आज भाजप आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आमनेसामने आले. भाजप अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख तुषार भोसले आज पंढरपुरात आले होते. कोणतेही निर्बंध घाला पण मंदिरं बंद केली तर खपवून घेणार नाही, ती सरकार बरखास्तीच्या दिशेनं पाऊल असेल असा इशारा त्यांनी दिला. राष्ट्रवादीचे कार्यकर्ते त्यांचा निषेध करायला आल्यानं दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते आमनेसामने आले आणि त्यांच्यात धक्काबुक्की झाली. त्यामुळे तणाव निर्माण झाला.
Continues below advertisement