एक नाही 43 कारखान्यांवर कारवाई झाली पाहिजे, माजी खासदार राजू शेट्टी यांची ईडी कारवाईवर प्रतिक्रिया
राज्यात गेल्या दहा वर्षांपासून गाजत असलेल्या राज्य सहकारी बँक घोटाळ्यात काल ईडीने अजित पवार यांच्या ताब्यात असेलल्या कारखान्याची मालमत्ता जप्त केली. एवढ्या जुन्या घोटाळ्यात ईडीने आत्ताच का हे पाऊल उचलले यावर अनेक तर्क लढवले जात आहेत. केंद्राचा याच्याशी संबंध जोडला जात असला तरी माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या काळात ४३ कारखाने कसे कवडीमोल विकले गेले याचा तपशिलवार खुलासा झाला होता. ईडीच्या कारवाईने यात पहिल्यांदात अजित पवारांची मालकी आणि बिव्हीजी ग्रुपचेही नाव व्यवहार आले.