Bus Accident : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात,३५ जण जखमी
Continues below advertisement
मुंबई-पुणे एक्स्प्रेसवर बोरघाटात खासगी बसचा अपघात झालाय. अपघातात दोन विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला असून ३५ जण जखमी झाले आहेत. मुंबईतील चेंबूर येथील एका खासगी क्लासची सहल मावळ येथे जात असताना हा अपघात झालाय. अपघातातील जखमींवर कामोठे येथील एमजीएम आणि खोपोलीच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
Continues below advertisement