Solapur : कर्नाटकातील विजयपूर-हुबळी महामार्गावर भीषण अपघात, माजी सरपंचासह सोलापुरातील चौघे ठार

कर्नाटकातील विजयपूर-हुबळी महामार्गावर  जुमनाळजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात नांदणी गावचे माजी सरपंच चिदानंद सुरवसे यांच्यासह चौघांचा जागीच मृत्यू झालाय. काल संध्याकाळी साडेसहाच्या सुमारास हा अपघात घडला. फॉर्च्युनर गाडीतून माजी सरपंच सुरवसे यांच्यासह संदीप पवार, चालक सोमनाथ काळे आणि विजय अंगडी यांचा मृत्यू झालाय. एसटी आणि फॉर्च्युनर कारची धडक होऊन अपघात झाला. एसटीची धडक बसल्यानंतर फॉर्च्युनर कार उलटली. त्यामुळे चौघे गाडीखाली येऊन त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे मृतदेह बाहेर काढण्यासाठी जेसीबीचा वापर करावा लागल्याची माहिती आहे. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola