Belgaum : हळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांवर काळाचा घाला, भीषण अपघातात 7 जणांचा मृत्यू
abp majha web team
Updated at:
21 May 2022 12:25 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appहळदीच्या कार्यक्रमाला गेलेल्या पाहुण्यांच्या गाडीला भीषण अपघात झाल्याची घटना बेळगावात घडलीये...हे सगळे प्रवासी क्रूझर गाडीतून लग्नाच्या हळदीचा कार्यक्रम आटोपून परत येत होते. या दरम्यान क्रुझर झाडावर आदळून यात 7 जण जागीच मृत्यूमुखी पडलेत,तर 6 जण गंभीर जखमी झाले. झाडाला दिलेल्या जोरदार धडकेमुळे क्रुझर गाडीचा अक्षरश: चक्काचूर झाला. या अपघाताचं कारण अद्याप अस्पष्ट आहे. अपघातातील जखमींना त्वरित धारवाड जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलंय..