Abu Azami On MVA : हिंदुत्ववाद्यांसोबत सपा राहणार नाही, अबू आझमी ठाम

Continues below advertisement

Abu Azami On MVA : हिंदुत्ववाद्यांसोबत सपा राहणार नाही, अबू आझमी ठाम

उद्धव ठाकरे यांनी आगामी मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीत हिंदुत्त्वाचा मुद्दा प्रचाराच्या केंद्रस्थानी ठेवण्याचा आदेश शिवसैनिकांना दिल्यानंतर समाजवादी पक्षाचे आमदार अबू आझमी (MLA Abu Azmi) प्रचंड नाराज झाले आहेत. या पार्श्वभूमीवर अबु आझमी यांनी विधानसभेच्या विशेष अधिवेशनाच्या (Vidhan Sabha Adhiveshan) पहिल्याच दिवशी महाविकास आघाडीतून बाहेर पडण्याचे स्पष्ट संकेत दिले. विधानसभा निवडणुकीत मविआने घटकपक्ष असलेल्या समाजवादी पक्षासाठी (Samajwadi Party) जागा सोडल्या होत्या. सपाचे अबु आझमी हे शिवाजीनगर मानखुर्द विधानसभा आणि रईस शेख हे भिवंडी मतदारसंघातून निवडून आले होते. मात्र, आज अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी अबु आझमी यांनी महाविकास आघाडीतून (Mahavikas Aghadi) बाहेर पडण्याचे संकेत दिले. तर दुसरीकडे भिवंडीचे आमदार रईस शेख यांनी कालच सोशल मीडियावरुन ठाकरे गटाच्या हिंदुत्त्ववादी भूमिकेचा विरोध केला होता. त्यामुळे आता समाजवादी पक्षाचे दोन्ही आमदार मविआतून बाहेर पडतील, असे स्पष्ट संकेत मिळत आहेत. 

 मविआच्या सर्व आमदारांनी आज शपथ घेण्यास नकार देत विधानसभेच्या कामकाजावर बहिष्कार टाकला होता. मात्र, अबु आझमी यांनी मविआच्या भूमिकेशी फारकत घेत आमदारकीची शपथ घेतली. तर भिवंडीचे आमदार रईस शेख यांनीही आमदारकीची शपथ घेतली. 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram