ABP News

ABP Majha Headlines : 11 AM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात, प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप, माहिती आणि पुरावे असल्याचाही दावा..

नीलम गोऱ्हेंच्या उद्धव ठाकरेंबाबतच्या वक्तव्याविरोधात महिला पदाधिकारी रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत, तर रश्मी ठाकरेंच्या उपस्थितीत पुण्यातील महिला पदाधिकाऱ्यांची मातोश्रीवर बैठक

स्वच्छ प्रशासन असलेच पाहिजे, असे करताना कुणाचीही पर्वा करु नका, दिल्लीतील भेटीत पंतप्रधान मोदींचा मुख्यमंत्री फडणवीसांना कानमंत्र

मुंबईत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे पुन्हा एकत्र, एका शासकीय अधिकाऱ्याच्या मुलाच्या लग्नसोहळ्यात राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे एकत्र आल्यानं चर्चा

जनता दरबारमुळे शिवसेना-भाजपमध्ये शीतयुद्ध, एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार तर पालघरमध्येही जनता दरबार घेण्याचं सरनाईकांचं आव्हान

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांच्या अडचणी वाढण्याची शक्यता, आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी जगद्गुरु नरेंद्राचार्यजी महाराज वडेट्टीवारांची तक्रार करणार

कृषीमंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला, सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा..स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवर दबाव वाढणार...

संतोष देशमुखांच्या हत्येचा निष्पक्ष तपास होण्यासाठी धनंजय मुंडेंनी मंत्रिपदापासून दूर राहावं, छत्रपती संभाजीनगरच्या विद्रोही साहित्य संमेलनात ठराव...

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram