ABP Majha Headlines : 10 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा....मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर शहरात कडेकोट बंदोबस्त तर मस्साजोग गाव बंद
संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार ३ आरोपींचा खून, अंजली दमानियांचा आरोप, आपल्याला फोन आला असून माहिती पोलीस अधीक्षकांना दिल्याचा दावा
ठरवलं तर पाच मिनिटात वाल्मिक कराडला पकडून आणता येईल, पण मंत्र्यांसोबतच्या संबंधांमुळे कराड मोकाट, संभाजीराजे छत्रपतींचा आरोप, धनंजय मुंडेंना मंत्रिपदावर राहण्याचा अधिकार नसल्याचा दावा..
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, पार्थिव अंत्यदर्शनासाठी काँग्रेस मुख्यालयात तर थोड्याच वेळात निघणार अंत्ययात्रा
मुंबईतील साकीनाका परिसरातील दोन गोदामांना भीषण आग, अग्निशमन दलाच्या जवानांकडून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न
होमिओपॅथी डॉक्टरांना अॅलोपॅथी औषधे देण्यासाठी एफडीएची परवानगी, इंडियन मेडिकल असोसिएशनचा एफडीएच्या निर्णयाला विरोध
चौथ्या टेस्टमध्ये नितीशकुमार रेड्डीचं अर्धशतक, वॉशिंग्टन सुंदरसोबत किल्ला लढवत फॉलोऑन टाळला, भारताच्या आतापर्यंत ७ बाद ३२५ धावा..