ABP Majha Headlines : 07 AM : 28 डिसेंबर 2024 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

संतोष देशमुख खून प्रकरणातील फरार ३ आरोपींचा खून, अंजली दमानियांचा आरोप, आपल्याला फोन आला असून माहिती पोलीस अधीक्षकांना दिल्याचा दावा

संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ आज बीडमध्ये  सर्वपक्षीय मूक मोर्चा....सकाळी ११ वाजता डॉ. आंबेडकर चौकातून मोर्चा निघणार... मारेकऱ्यांना तात्काळ अटक करण्याची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी तपासाला वेग..सीआयडीकडून वाल्मिक कराडची पत्नी मंजिलीची दोन तास चौकशी

मुंबईच्या घाटकोपरमध्ये भरधाव टेम्पोनं पाच जणांना चिरडलं...एका महिलेचा दुर्दैवी मृत्यू तर चार जण जखमी..

नाशिक, नंदुरबार, अमरावती, अकोला, जळगावसह अनेक भागात अवकाळी... कांदा, गहू आणि रब्बी पिकांना फटका... यवतमाळच्या मारेगावात वीज पडून शेतकरी महिलेचा मृत्यू... 

माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार, उपराष्ट्रपती, पंतप्रधानांसह दिग्गजांकडून श्रद्धांजली अर्पण, मनमोहन सिंग यांचं स्मारक बांधण्याची काँग्रेसची मागणी

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram