ABP Majha Headlines : 06 PM : 05 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन फडणवीसांची तंबी...यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीत वक्तव्य...बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन...
काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य...संतोष देशमुख प्रकरणात फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक...
फडणवीसांचा उल्लेख देवेंद्र बाहुबली, आमदार सुरेश धस यांच्याकडून भरसभेत कौतुकाचा वर्षाव, तर आपण बाहुबलीची आई शिवगामी, पंकजा मुंडेंचं वक्तव्य...
मराठवाड्यातली पुढची पिढी दुष्काळ पाहणार नाही, मुख्यमंत्री फडणवीसांचं आश्वासन...फडणवीसांच्या हस्ते कुंटेफळ साठवण तलावाचं भूमिपूजन, सुरेश धस, पंकजा मुंडेंची उपस्थिती...
महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच..तर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा, खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप
छत्रपती शिवाजी महाराजांचा अनादर करणारे अभिनेते राहुल सोलापूरकरांच्या घराबाहेर ठाकरेंच्या शिवसैनिकांचा राडा, नाक घासून सोलापूरकरांनी माफी मागण्याची शिवसेनेची मागणी...
रामराजे नाईक निंबाळकरांचे चुलत भाऊ संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या घरावर इन्कमटॅक्सचा छापा, सकाळी सहा पासून फलटणसह मुंबई-पुण्याच्या घराची झाडाझडती..
वर्षा बंगल्यावर रेड्याचे शिंग पुरल्याच्या आरोपावर शिंदेची शिवसेना आक्रमक, अंधश्रद्धा पसरवल्याबद्धल गृहखात्याने संजय राऊत यांच्यावर गुन्हा दाखल करावा, शंभूराज देसाईंची मागणी
दिशा सालियन मृत्यू प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाकडून याचिकाकर्त्यांना दोन आठवड्यांची मुदत... आदित्य ठाकरेंना ताब्यात घेऊन चौकशीची गरज का? हे पटवून द्या, कोर्टाचा याचिकाकर्ते राशिद खान पठानला सवाल