ABP Majha Headlines : 05 PM : 29 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

दहावी, बारावीच्या परीक्षेला बुरखा घालून प्रवेश नको..कॉपीचे प्रमाण वाढण्याची शक्यता व्यक्त करत नितेश राणेंचं शिक्षणमंत्री दादा भुसेंना पत्र

देवेंद्र फडणवीस आणि अजित पवारांनी राजीनामा मागितला तर लगेच देणार, धनंजय मुंडेचा दिल्लीत पुनरुच्चार, ५० दिवसांपासून मीडिया ट्रायल सुरु असल्याची खंत, देशमुखांच्या मारेकऱ्यांना फासावर लटकवण्याचीही मागणी 

पन्नास दिवसांपासून पक्ष बदनाम होत असेल तर लगेच राजीनामा दिला असता, धनंजय मुंडेच्या राजीनाम्याबाबत सुप्रिया सुळे आक्रमक, तर सुप्रिया सुळेंना बावनकुळेचं प्रत्युत्तर 

मस्साजोग सरपंच देशमुखांच्या हत्येला पन्नास दिवस पूर्ण, कृष्णा आंधळेही पन्नास दिवसांपासून फरारच.. धनंजय देशमुख सीआयडी अधिकाऱ्यांची भेट घेणार

नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारावरुन पालकमंत्री शिंदेंच्या नाराजीची चर्चा, मंत्रिमंडळ बैठकीतही ऑनलाईन उपस्थिती, शंभूराज देसाई आणि चंद्रशेखर बावनकुळेंकडून नाराजीचा मात्र इन्कार

कोणीही मंत्री कोणत्याही जिल्ह्यात दरबार भरवू शकतो, नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबाराचं बावनकुळेंकडून समर्थन, तर शिंदेंच्या शिवसेनेचा पालघरमध्ये दरबार भरवण्याचा इशारा

पुण्यातील कमला नेहरू रुग्णालयात  न्यूरोलॉजिस्टच नाही.. त्यामुळे रुग्णांची गैरसोय.. जीबीएस रुग्णांच्या जीवाशी महापालिका खेळतेय का? संतप्त सवाल

गोविंद पानसरेंच्या हत्या प्रकरणातील आरोपींना मुंबई उच्च न्यायालयाकडून जामीन...खटला लवकर निकाली लागण्याची शक्यता नसल्याने आरोपींना जामीन, कोर्टाचा निर्वाळा

 

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram