
ABP Majha Headlines : 06 PM : 13 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
ठाकरेंची साथ सोडलेल्या राजन साळवींचा अखेर शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश... त्यांच्या विचारांना लागली वाळवी म्हणून पक्षात आले साळवी असं म्हणत शिंदेंकडून राजन साळवींचं स्वागत...
साळवींच्या पक्षप्रवेशावेळी एकनाथ शिंदेंची डॉयलॉगबाजी...शोले आणि दीवारमधले डॉयलॉग मारत उद्धव ठाकरेंना टोला...
दिल्ली दौऱ्यात आदित्य ठाकरेंच्या मॅरेथॉन गाठीभेटी.. रात्री राहुल गांधी तर दुपारी केजरीवालांसोबत चर्चा...पवारांची भेट न घेतल्यानं चर्चांना उधाण ....
आदित्य ठाकरे आणि खासदारांध्ये एक तास बैठक, खासदारांमध्ये समन्वय राखण्याच्या आदित्य ठाकरेंच्या सूचना, खासदारांची वज्रमूठ कायम ठेवण्याचाही आग्रह...
शिंदे गटाकडून आयोजित जेवणावळींना खासदारांनी परवानगीशिवाय जाऊ नये, आदित्य ठाकरेंनी बजावलं... सूचनेवर खासदार नाराज असल्याची चर्चा
दिल्लीत दोन्ही शिवसेना खासदारांच्या जेवणावळी, प्रतापराव जाधवांच्या स्नेहभोजनाला ठाकरेंचे तीन खासदार...तर नागेश पाटील आष्टीकरांच्या स्नेहभोजनाला शिंदेच्या खासदारांची हजेरी...
शिवसेना खासदार संजय जाधवांची माध्यमांशी अरेरावी, दिल्लीतल्या जेवणावळींवरचा प्रश्न जाधवांना झोंबला, जाधवांनी पक्षशिस्त ओळखावी, अरविंद सावंतांचं वक्तव्य
उमेदवारी दाखल करताना माहिती लपवल्याबद्धल परळीच्या फौजदारी न्यायालयाची धनंजय मुंडेंना नोटीस, करुणा मुंडेंच्या तक्रारीवरून दाखल खटल्यात कारणे दाखवा नोटीस...करुणा मुंडेंनी मानलेत मुख्यमंत्री फडणवीसांचे आभार...