ABP Majha Headlines : 03 PM : 22 ऑक्टोबर 2024 : Maharashtra News : एबीपी माझा हेडलाईन्स
महायुतीमध्ये अद्यापही जागावाटपाचा तिढा.. अजित पवारांसह प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे दिल्लीत.. भाजप श्रेष्ठींशी करणार चर्चा...
महायुतीत एकनाथ शिंदेंना हव्या आहेत ८५ जागा, ६० जागांची पहिली यादी दिल्यानंतर आणखी २५ जागांची यादी सादर..
महाविकास आघाडीत काँग्रेसच राहणार मोठा भाऊ, काँग्रेसला ११० तर शिवसेनेला ९० जागा मिळण्याची शक्यता, शरद पवारांच्या राष्ट्रवादीसाठी ७५ जागा शक्य...
गणेश नाईकांचे चिरंजीव संदीप नाईकांचा शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश, भव्य मेळाव्यात जयंत पाटलांच्या उपस्थितीत हाती तुतारी, बेलापूरमध्ये मंदा म्हात्रेंना आव्हान
निलेश राणे उद्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हाती धनुष्यबाण घेणार, घोषणेनंतर सोशल मीडिया प्रोफाईलवर शिवसेनेचा लोगो
निवडणुकीच्या धामधुमीत अजित पवारांना सुप्रीम कोर्टाचा मोठा दिलासा, घड्याळ हेच चिन्ह कायम राहणार...
देवेंद्र फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आजही उमेदवार आणि इच्छुकांच्या रांगा,संभाव्य उमेदवारांचीही फडणवीसांकडं आर्जवं..
खेड शिवापूर टोलनाक्यावर सापडलेले ५ कोटी आपलेच असल्याचा काँट्रॅक्टरचा आयकर विभागाकडे जबाब, राजकीय कनेक्शनचा तपास सुरू असल्याची पोलिसांची माहिती