ABP Majha Headlines : 02 PM : 24 फेब्रुवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स
नीलम गोऱ्हे लक्षवेधी लावायला आमदारांकडून पैसे घेतात, मर्सिडीज आरोपांना प्रत्युत्तर देताना खासदार संजय राऊतांचा सनसनाटी आरोप, माहिती आणि पुरावे असल्याचाही दावा...
संमेलनातील राजकीय चिखलफेकीची जबाबदारी शरद पवार झटकू शकत नाहीत, संजय राऊतांची तीव्र प्रतिक्रिया, नीलम गोऱ्हेंच्या वक्तव्याचा निषेध करण्याचीही मागणी
विधानसभा उमेदवारीसाठी नीलम गोऱ्हेंनी पैसे घेतले, नाशिकचे माजी महापौर विनायक पांडेंचा आरोप....वारंवार डिवचलं तर सर्वकाही बाहेर येईल, किशोर तिवारींचा इशारा
मराठी केंद्रीय मंत्र्यांनी साहित्य संमेलनाकडे पाठ फिरवल्याने नाराजी, मुरलीधर मोहोळ यांना संमेलनाचं सरकार्यवाहक आणि रक्षा खडसेंना कार्यकारी अध्यक्षपद देऊनही संमेलनापासून दूर
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यात मंत्री गणेश नाईकांचा जनता दरबार, तर दरबारी राजकारण म्हणत शिवसेनेच्या हेमंत पवारांचा नाईकांवर हल्लाबोल
कृषीमंत्री कोकाटेंच्या भवितव्याचा आज फैसला, सत्र न्यायालय शिक्षेला स्थगिती देणार का याची उत्कंठा..स्थगिती न मिळाल्यास आमदारकी रद्द करण्यासाठी राहुल नार्वेकरांवर दबाव वाढणार...
सुप्रीम कोर्टात महापालिका निवडणुकीसंबंधी उद्या सुनावणी, तीन वर्षांपासून रखडलेल्या मनपा आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा होण्याची शक्यता...
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांविरोधात राज्यात ठिकठिकाणी आंदोलनं, नरेंद्राचार्यजी महाराजांविरोधात आक्षेपार्ह वक्तव्याप्रकरणी अनुयायी आक्रमक