ABP Majha Headlines : 01 PM : 01 जानेवारी 2025 : Maharashtra News : ABP Majha एबीपी माझा हेडलाईन्स

Continues below advertisement

संतोष देशमुख हत्याप्रकरणी गावकऱ्यांचं जलसमाधी आंदोलन मागे..तपासासाठी १० दिवसांचा वेळ देण्याचं एसपींचं आवाहन, १० दिवसात अटक न केल्यास पुन्हा आंदोलन, गावकऱ्यांचा इशारा

आत्मसमर्पणापूर्वी २२ दिवस वाल्मिक कराड नेमका होता कुठे, एबीपी माझाच्या हाती खडा न खडा माहिती, सीआयडीने चौकशी केलेल्या महिलेकडेही काही दिवस मुक्काम

वाल्मिक कराडच्या आत्मसमर्पणानंतर धनंजय मुंडेंबाबत अजित पवार काय भूमिका घेणार याकडे लक्ष, मुंडेंवर होणाऱ्या आरोपांवर अजित पवारांच्या उत्तराची प्रतीक्षा

कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसण्याची शक्यता, माजी आमदार राजन साळवी पक्षाला रामराम करण्याच्या तयारीत, साळवी महिनाभरात निर्णय घेणार असल्याची चर्चा 

पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटलांच्या पाळधी गावात दोन गटातील वादाचं पर्यावसान जाळपोळीत, उद्या सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी, २० ते २५ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

नव्या वर्षात ईडा पिडा टळून सगळं दादाच्या मनासारखं व्हावं, घरातले वादही संपावेत.. उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या आईंचं विठूरायाला साकडं.. नववर्षाच्या पहिल्या दिवशी आशाताईंचं विठ्ठल दर्शन

नव्या वर्षानिमित्त राज ठाकरेंची एक्स पोस्ट, मराठी माणसावर, हिंदूंवर अन्याय झाल्यावर अंगावर येऊ, राज ठाकरेंचा इशारा, महिलांवर अत्याचार करणाऱ्यांना फोडून काढण्याचं आवाहन

राजकीय लाभ घेण्यासाठी मंदिरांचा वापर नको, आरएसएसचे मुखपत्र पांचजन्यचेही बदलले सूर.. सरसंघचालकांच्या भूमिकेचं जाहीर समर्थन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram