Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 29 ऑगस्ट 2021 | रविवार | ABP Majha

Continues below advertisement

1. आगामी दहीहंडी आणि गणेशोत्सवात कोरोना संसर्ग रोखण्यासाठी स्थानिक निर्बंध लावा, केंद्र सरकारची राज्याला सूचना

2. लगे रहो..मोदींनी फोनवरुन संभाषण साधल्याचा राणेंचा दावा, लसीकरणासाठी राज्य सरकारनं बारा टक्के कमिशन मागितल्याचा गंभीर आरोप

3. राज्यातील शाळा लवकरच सुरु होण्याची शक्यता, फक्त विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि कर्मचाऱ्यांचं लसीकरण गरजेचं, डॉ. समीर दलवाई यांचं मत

4. सगळंच अनलॉक असताना मंदिरं बंद का? 10 दिवसांत मंदिर सुरु करा अन्यथा आंदोलन करणार, अण्णा हजारेंचा ठाकरे सरकारला अल्टिमेटम

5. भारताशी सलोख्याचे संबंध ठेवण्याची तालिबानची तयारी, आज मोदी 'मन की बात'मध्ये काय भूमिका घेतात याकडे लक्ष

6. 2050 पर्यंत दक्षिण मुंबईचा 80 टक्के भाग पाण्याखाली जाणार, महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांचा इशारा, हवामान बदलाचा धोका गांभीर्यानं घेण्याचा सल्ला

7. कळवा ऐरोली उन्नत रेल्वे मार्गाला भूसंपादनाचे ग्रहण, प्रकल्पाची किंमत अंदाजे 100 कोटींनी वाढली

8. पंढरपुरातील नगरसेवक संदीप पवार हत्या प्रकरणातील आरोपी तब्बल साडेतीन वर्षांनी गजाआड

9. ड्रग्ज प्रकरणी बिगबॉस फेम अरमान कोहलीला अटक, घराची झाडाझडती घेतल्यानंतर एनसीबीची कारवाई

10. मध्य प्रदेशच्या नीमचमध्ये युवकाला ट्रकला बांधून फरफटत नेले, युवकाचा मृत्यू, चार आरोपी अटकेत

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram