Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 15 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha

Continues below advertisement

१. दसरा मेळाव्यानिमित्त उद्धव ठाकरेंचे बाण कुणाचा वेध घेणार याकडे महाराष्ट्राचं लक्ष, महापालिका निवडणुकांचं रणशिंगं फुंकण्याची शक्यता

२. पंकजा मुंडेंच्या मनातलं वादळ आज भगवान भक्तीगडावर घोंगावणार, दसरा मेळाव्यानिमित्तच्या भाषणाची उत्सुकता शिगेला

३. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा विजयादशमी उत्सव, सरसंघचालकांचं भाषण तर कोल्हापुरातील दसरा चौकात शाही मेळावा

४. दसऱ्याच्या मुहुर्ताकडून बाजारपेठेला मोठी अपेक्षा, लॉकडाऊनमुळं आलेली मरगळ दूर करुन ज्वेलर्स, ऑटोमोबाईल डिलर्स, बिल्डर्स ग्राहकांच्या प्रतीक्षेत

५. पुण्यात 8 नोव्हेंबरपासून रिक्षा भाडेवाढ लागू होणार, पहिल्या दीड किलोमीटरसाठी किमान भाडे 20 रुपये असणार

६. करमुसे मारहाण प्रकरणी मंत्री जितेंद्र आव्हाड यांना अटक आणि जामीन, कोरोनाकाळात दिेवे लावण्याच्या आवाहनानंतर झालेल्या वैचारिक मतभेदावरुन मारहाण केल्याचा आरोप

७. जिल्हा परिषदांमध्ये आरोग्य विभागातील लेखी परीक्षेच्या तारखांचा घोळ, लेखी परीक्षेचा खेळखंडोबा होण्याची भिती

८. राज्यात काल 2,384 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद, तर पुणे जिल्ह्यात सर्वाधिक अॅक्टिव्ह रुग्ण

९. नाशिकमध्ये बेकायदेशीररित्या सुरु असलेल्या गरबा कार्यक्रमावर पोलिसांची कारवाई, काही जणांविरुद्ध गुन्हे  

१०. आज आयपीएलचा अंतिम सामना, चेन्नई सुपरकिंग्स आणि कोलकाता नाईट रायडरचा महामुकाबला

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram