Smart Bulletin : स्मार्ट बुलेटिन : 01 ऑक्टोबर 2021 : शुक्रवार : ABP Majha
महाराष्ट्रात मान्सूनचा आणखी 15 दिवस मुक्काम, पुढचे 10 दिवस विजांच्या कडकडाटासह पावसाची शक्यता, यंदा राज्यात सरासरीच्या 119 टक्के पावसाची नोंद
पेट्रोल, डिझेल, घरगुती गॅस महागल्यानंतर आता नवीन झटका, नैसर्गिक वायुचे दर 62 टक्क्यांनी वाढले, सीएनजी आणि घरगुती पाईप गॅस महागण्याची चिन्ह
अनिल देशमुख प्रकरणात सीबीआयचं मुख्य सचिव कुंटे आणि पोलीस महासंचालक पांडेंना समन्स, सीबीआयनं कार्यालयात येऊन माहिती घ्यावी, दोन्ही अधिकाऱ्यांचा पवित्रा
पुणे महापालिकेच्या उद्यानावर सावित्रीबाई फुलेंच्या नावापुढे साध्वी असा उल्लेख, 30 वर्षांपूर्वी लागलेल्या फलकावरचे शब्द आता हटवले
नवरात्रोत्सवात दररोज फक्त 15 हजार भाविकांनाच तुळजाभवानीचं दर्शन घेता येणार, तर मुंबईतही सलग दुसऱ्या वर्षी गरब्याला बंदी
कोरोना काळातील फी माफ न केल्यानं आज मार्डच्या डॉक्टरांचा राज्यव्यापी संप, संपादरम्यान कोरोनाबाधितांच्या उपचारात खंड पडणार नाही
कार चालकानं अचानक यूटर्न घेतल्यानं दुचाकीस्वाराला धडक, लोअर परळ ब्रिजवरील घटना, दुचाकीवरील दोघांचा मृत्यू
2009 मध्ये घडलेल्या मिरजेच्या गणेशोत्सव दंगल प्रकरणातील 106 जणांची निर्दोष मुक्तता, सांगली जिल्हा सत्र न्यायालयाचा निकाल
ह्युरन इंडियाच्या यादीत सलग दहाव्या वर्षी मुकेश अंबानी आशियातील सर्वाधिक श्रीमंत, गौतम अदानींच्या संपत्तीत लक्षणीय वाढ
चेन्नईचं प्ले ऑफचं तिकीट पक्कं! हैदराबादचा सहा गडी राखून पराभव, आज कोलकाता-पंजाब भिडणार