Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 7 ऑक्टोबर 2021 गुरुवार | ABP Majha

महत्वाच्या दहा बातम्यांचा आढावा या स्मार्ट बुलेटिनच्या माध्यमातून घेतला जातो. दररोज सकाळी हे बुलेटिन प्रसारित केलं जातं. 

स्मार्ट बुलेटिन | 07 ऑक्टोबर 2021 | गुरुवार | एबीपी माझा

1.घटस्थापनेच्या मुहूर्तावर राज्यभरातील मंदिरांचे दरवाजे उघडले, दर्शनासाठी ठिकठिकाणी सकाळपासूनच भक्तांची रिघ

2.आजपासून नवरात्रौत्सवाला सुरुवात, मंचकी निद्रेनंतर तुळजाभवानीचा अभिषेक, अंबाबाई, सप्तश्रुंगी आणि माहूरमध्ये दर्शनासाठी रात्रीपासूनच भक्तांची गर्दी

3. मंदिर उघडताच नेत्यांची मंदिरांकडे धाव, मुख्यमंत्री सहकुटुंब मुंबादेवीच्या दर्शनाला, अजित पवार सहकुटुंब सिद्धविनायकाच्या चरणी, इतर नेत्यांकडूनही देवदर्शनानं दिवसाची सुरुवात

4. पुढचे 5 दिवस मुंबईसह राज्यभर विजेच्या कडकडाटासह पावसाचा अंदाज, काल पुण्यात इमारतीवर वीज कोसळतानाची दृश्य कॅमेऱ्यात कैद

5.क्रूझ पार्टी प्रकरणी आर्यन खानसह इतर आरोपींच्या जामिनावर आज सुनावणी, कारवाईदरम्यान भाजप नेत्यांच्या उपस्थितीवरुन नवाब मलिकांचा हल्लाबोल,

6. लखीमपूर हिंसाचाराची सर्वोच्च न्यायालयाकडून दखल, आज मुख्य न्यायमूर्तींच्या खंडपीठाकडून सुनावणी, तर काल राहुल आणि प्रियांका गांधींकडून मृतांच्या कुटुंबियांचं सांत्वन

7. अतिवृष्टीनं नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून मदत जाहीर,  122 कोटी 26 लाख 30 हजार रुपयांचा निधी मंजूर

8. देशात पेट्रोल-डिझेल दरवाढीचं सत्र सुरु; पेट्रोलच्या दरांत 30 पैशांची, तर डिझेलच्या दरांत 35 पैशांची वाढ, देशातील सर्वाधिक किंमत मुंबईत

9. सिंधुदुर्ग विमानतळावर विमानाचे सुरक्षित लँडिंग-टेकऑफ! गोवा ते सिंधुदुर्ग यशस्वी चाचणी

10. हैदराबादकडून अतितटीच्या लढतीत विराटच्या बंगळुरुचा चार धावांनी पराभव, आज चेन्नईविरुद्ध पंजाबची लढत

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola