ABP Majha Sanman Awards : एबीपी माझा सन्मान पुरस्कार, सोहळ्याला दिग्गजांची उपस्थिती

एबीपी माझाचा माझा सन्मान 2022 पुरस्कार सोहळा आज मुंबईत पार पडला. या पुरस्कार सोहळ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, गौर गोपालदास महाराज यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली होती. यावेळी सामाजिक, मनोरंजन, कला, लोककला, समाजकार्य, विज्ञान, उद्योग अशा विविध क्षेत्रातील दिग्गजांना 'माझा सन्मान' बहाल करण्यात आला. ज्यांनी आपल्या कार्याचा आणि कर्तृत्वाचा ठसा उमटवला, महाराष्ट्रासह देशानंही ज्यांच्या कार्याची दखल घेतली अशा गुणीजनांना माझा सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं. लवकरच हा माझा सन्मान सोहळा 14 आणि 15 ऑगस्ट रोजी तुम्ही एबीपी माझावर पाहू शकणार आहात. 

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola