Zero Hour : ठाकरेंच्या टीकेवर जनतेचा कौल काय? अशा टीकेचा खरंच फायदा होतो?

Continues below advertisement
एबीपी माझाच्या 'झीरो अवर' या कार्यक्रमात उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्या अलीकडच्या टीका-टिप्पण्यांवर जोरदार चर्चा झाली. 'टीका करणं, टोंबणे मारणं याशिवाय उद्धव ठाकरेंना (Uddhav Thackeray) येतं काय?', असा थेट सवाल इंस्टाग्रामवर सतीश नाईक यांनी विचारला. या चर्चेदरम्यान दर्शकांनी सोशल मीडियावर विविध प्रतिक्रिया दिल्या. फेसबुकवर शंकर जाधव यांनी लिहिले की, 'दिल्लीसमोर महाराष्ट्र कधी झुकला नाही, झुकणार नाही.' तर विठ्ठलराव टाकळे म्हणाले की, 'हा फायदा-तोट्याचा हिशोब नाही, महाराष्ट्राची अस्मिता धुळीस मिसळत आहे.' याउलट, काही दर्शकांनी ठाकरे यांच्या शैलीवर टीका केली. कार्यक्रमात घेतलेल्या पोलमध्ये १९,००० लोकांनी मत दिले, ज्यात ७१ टक्के लोकांना वाटते की या टीकेचा फायदा होईल, तर २९ टक्के लोकांनी होणार नाही असे मत दिले.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola