Chhatrapati Sambhajinagar संभाजीनगरमध्ये जमिनीला सोन्याचा भाव, दलालांची व्यवहार करण्यासाठी धावाधाव

Continues below advertisement
छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) जवळील दिल्ली-मुंबई इंडस्ट्रियल कॉरिडॉरमुळे (DMIC) जमिनींच्या भावात मोठी तेजी आली आहे. 'पाच वर्षांपूर्वी एक रुपयाची असलेली जमीन आज दहा रुपये झाली आहे,' अशी माहिती परिसरातील जमीन दलालांनी दिली आहे. शेंद्रा-बिडकीन (Shendra-Bidkin) परिसरातील पोरगाव चौकलीसारख्या ठिकाणी दररोज १५ ते २० जमिनींचे व्यवहार होत असून, सकाळी विक्रीसाठी आलेली जमीन संध्याकाळपर्यंत विकली जात असल्याचे चित्र आहे. टोयोटा (Toyota) सारख्या मोठ्या कंपन्यांच्या गुंतवणुकीमुळे या परिसरातील सुमारे ५० किलोमीटरच्या परिसरात जमिनी खरेदी-विक्रीला वेग आला आहे. या विकासामुळे छत्रपती संभाजीनगरजवळ एक नवीन पिंपरी-चिंचवड तयार होत असल्याची भावना व्यक्त होत आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Continues below advertisement
Sponsored Links by Taboola