'एबीपी नेटवर्क'चं बदलांचं नवं पाऊल; राज्यपाल कोश्यारी आणि देवेंद्र फडणवीस यांच्याकडून शुभेच्छा!

Continues below advertisement

बदल हा आपल्या जीवनातील एक सातत्यपूर्ण घटक आहे. मग तो अमुक एका कालावधीमध्ये झालेला असो किंवा अगदी एकाएकी झालेला असो. हाच बदल आपल्याला अशा एका विश्वात नेतो जे वेगळं आहे, अनपेक्षित आहे आणि तितकंच नवंही आहे. ABP Network एबीपी नेटवर्कने देखील आपल्यात महत्वाचे बदल केले आहेत. यामुळं 'एबीपी' या ब्रँडची आणि त्याच्याशी संलग्न वाहिन्यांची ओळखच बदलली आहे. आज सकाळी सात वाजता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते एबीपी न्यूज नेटवर्कच्या नव्या लोगोचं, नव्या रुपाचं अनावरण करण्यात
आलं.
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासोबतच एबीपी माझाच्या बदलाचे अनेक मान्यवरही साक्षीदार आहेत. एबीपी माझाला अनेक मान्यवरांनी या नव्या बदलांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत. महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी आणि राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी एबीपी माझाला नव्या बदलांसाठी शुभेच्छा दिल्या आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram