ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 21 July 2024
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In Appशरद पवार देशातले भ्रष्टाचाऱ्यांचे सर्वात मोठे सरदार, पुण्यातून अमित शाहांचा पवारांवर घणाघात, १० वर्षांत पवारांनी महाराष्ट्राला काय दिलं?, शाहांचा सवाल
उद्धव ठाकरे औरंगजेब फॅन क्लबचे नेते, अमित शाहांचा हल्लाबोेल, संभाजीनगर नावाला विरोध करणाऱ्यांच्या मांडीवर ठाकरे बसल्याची शाहांची टीका
देवेंद्र फडणवीसांचं ठाकरे,पवार,पटोलेंना चॅलेंज, मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण मिळावं की नाही ते स्पष्ट करा असं आव्हान..
राजकारणात कधी तह तर कधी सलगी
करावी लागते, अजित पवारांशी केलेल्या हातमिळवणीसंदर्भात फडणवीसांची स्पष्टोक्ती
डीपीडिसीच्या बैठकीत पवार साहेबांचा कधी अपमान केला? अजित पवारांचा सुप्रिया सुळेंना सवाल, बोलू दिलं नाही हे मान्य असंही स्पष्टीकरण...
मुंबई, ठाण्यात मुसळधार पाऊस, अनेक ठिकाणी पाणी साचलं, येत्या २४ तासांत मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा मुंबई वेधशाळेचा अंदाज