
Rajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVE
Rajan Salvi Mumbai : शिवसेनेत प्रवेश करण्यामागचं नेमकं कारण काय? राजन साळवी EXCLUSIVE
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंची इमान राखलेल्या मोजक्या आमदारांमध्ये गणल्या जाणाऱ्या राजन साळवींचा (Rajan Salvi) शिंदे गटात पक्षप्रवेश होण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे . आज (13 फेब्रुवारी) गुरुवारी दुपारी 3 वाजता एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत ते शिवसेनेत प्रवेश करणार आहेत .राजन साळवींच्या पक्षप्रवेशावरून महाराष्ट्रात राजकीय पटलावर एकच चर्चा आहे .दरम्यान ठाकरेंच्या शिवसेनेला रामराम ठोकत शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करण्यामागे राजन साळवींच कारण काय ? 'Abp माझा 'ने विचारल्यानंतर राजन साळवी काय म्हणाले ?पाहूयात .
काय म्हणाले राजन साळवी ?
'सलग तीन विधानसभा निवडणुकीत मी विजयी झालेला आमदार आहे .2024 च्या विधानसभा निवडणुकीत माझा पराभव झाला .या पराभवाची कारण आहेत .त्यासंबंधी मी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली .सगळा प्रकार मी उद्धव ठाकरे यांच्या कानावर घातला .आज मी एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करत आहे .आम्हाला विश्वास आहे एकनाथ शिंदे यांचे नेतृत्व आमच्या मतदारसंघात विकास करेल .याच विश्वासाला माझ्या कार्यकर्त्यांनी ही साथ दिली . उद्धव ठाकरे यांच्यासमोर मी माझ्या भावना व्यक्त केल्यानंतर मी थोडे दिवस शांत होतो .
जिल्ह्याचा विकास करायचा असेल ,मतदार संघाचा विकास करायचा असेल तर एकनाथ शिंदे हे मला योग्य वाटले .आणि मी पक्षप्रवेश करायचा ठरवला .माझ्याकडे भाजप शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार गट यांच्यापैकी तीन पर्याय होते .वंदनीय बाळासाहेब ठाकरे हे पक्षाचे प्रमुख आहेत .आमची निशाणी एकनाथ शिंदेंकडे आहे .त्यामुळे आमच्या सगळ्या शिवसैनिकांची जाणीव झाली की एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आपण गेलं पाहिजे .एकनाथ शिंदेंचं काम आणि त्यांनी केलेली विकास काम याबद्दल सगळे आमचे कार्यकर्ते समाधानी आहेत .असे राजन साळवी म्हणाले .