ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 12PM TOP Headlines 12 PM 27 January 2025 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर छावा सिनेमातून लेझीमनृत्याचे दृश्य वगळण्यासाठी सहमत, मनसेप्रमुख राज ठाकरेंच्या भेटीनंतर आक्षेपार्ह भाग वगळण्यावर एकमत.. छावा १४ फेब्रुवारीलाच प्रदर्शित करण्यावर ठाम

छत्रपती संभाजीनगरमध्ये एसटी भाडेवाढीच्या निषेधार्थ उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेकडून चक्काजाम, मध्यवर्ती बसस्थानक परिसरात विरोधीपक्ष नेते अंबादास दानवेच्या नेतृत्वात आंदोलन

अजितदादांचे विश्वासू बाबूराव चांदेरेंचे प्रताप आणखी काही व्हि़डिओतून व्हायरल.. दोन दिवसांपूर्वी बिल्डरलाही मारहाण, गुन्हा नोंद तरीही अटकेसाठी टाळाटाळ, चांदेरेंच्या कारवायांची पक्षाकडून दखल 

नाशकात वीस वर्षीय महिलेवर सामूहिक अत्याचार, अत्याचार करणाऱ्या नराधमांमध्ये पीडित महिलेचा नातेवाईकच.. जेलमधील पतीला जामीन देण्याच्या आमिषाने अत्याचार केल्याची प्राथमिक माहिती

सैफ हल्ल्याप्रकरणी संशयित म्हणून ताब्यात असलेल्या आकाश कनौजियाची कैफियत एबीपी माझावर, सैफ प्रकरणात नाव आल्यावर लग्नही मोडल्याचा दावा.. 

रत्नागिरीच्या मिरकरवाड्यातील अतिक्रमण हटाओ मोहीमेला वेग.. पोलीस अधीक्षकांकडून परिसराची पाहणी, तोडकामाला कसलाही अडथळा नसल्याचं स्पष्ट.. मत्स्य आयुक्तांनीही केली मोहीमेची पाहणी

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram