ABP News

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 29 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 29 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

प्रयागराज महाकुंभमेळ्यात संगमावर मध्यरात्री दीडच्या सुमारास चेंगराचेंगरी.. चेंगराचेंगरीत १० भाविकांचा मृत्यू झाल्याची सुत्रांची माहिती तर अनेकजण जखमी, मृतांचा आकडा वाढण्याची भिती.

चेंगराचेंगरीनंतर मोदी आणि शाह योगींच्या संपर्कात, पंतप्रधानांची मुख्यमंत्र्यांशी पहाटेपासून तिसऱ्यांदा चर्चा, सर्व प्रकारच्या मदतीचं आश्वासन, गर्दी नियंत्रणासाठी रॅपिड अॅक्शन फोर्स तैनात

कुंभमेळ्याच्या आखाड्यातील महंत, महामंडलेश्वर शाहीस्नानासाठी रवाना, प्रशासनाच्या आवाहनाने गर्दी ओसरली.. पोलिसांची अतिरिक्त खबरदारी

महाकुंभमेळ्याचं प्रशासन लष्कराकडे सोपवा, चेंगराचेंगरीनंतर निरंजनी आखाड्याच्या महंताची पहिली प्रतिक्रिया, प्रशासकीय अनास्थेमुळेच दुर्घटना झाल्याचा आखाड्याचा आरोप 

नाशकात मौनी अमावस्येनिमित्त स्नानासाठी रामकुंडावर भाविकांची गर्दी.. प्रयागराज कुंभमेळ्यासाठी जाऊ न शकणारे भाविक रामकुंडावर 

जीबीएस संदर्भात पाहणीसाठी सात तज्ञांचं केंद्रीय पथक पुण्यात दाखल, पथक पाहणी न करताच परतत असल्याने गावकऱ्यांचा आक्रमक विरोध, ग्रामस्थांच्या रोषानंतर पथक विहिरीकडे..

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना ठाण्यातच घेरण्याची भाजपाची तयारी? पालघरचे पालकमंत्री आणि मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री गणेश नाईकांच्या ठाण्यातील जनता दरबारावरुन राजकीय चर्चांना वेग 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram