सकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025

Continues below advertisement

सकाळी ८ च्या हेडलाईन्स ABP Majha Marathi News Headlines 8AM TOP Headlines 08 AM 25 January 2025

एसटीचा प्रवास महागला, मध्यरात्रीपासून १५ टक्के भाडेवाढ लागू, सर्वसामान्य प्रवाशांच्या खिशावर मोठा भार 

भंडाऱ्याच्या ऑर्डिनन्स फॅक्टरीमधील स्फोटात आठ जणांचा मृत्यू, अधिकाऱ्यांवर कारवाईच्या मागणीसाठी अप्रेंटिसधारक आणि ग्रामस्थांचा पोलीस ठाण्याबाहेर ठिय्या, तर चौकशीसाठी एसआयटी स्थापन

आरक्षणाच्या मुद्द्यावरुन मनोज जरांगे आजपासून पुन्हा मैदानात, सरसकट कुणबी प्रमाणपत्रांसह इतर मागण्यांसाठी अंतरवाली सराटीत सातवं आमरण उपोषण

मुंबईत आज सर्वजातधर्मीय आणि सर्वपक्षीयांचा निषेध जनआक्रोश मोर्चा, संतोष देशमुख हत्या आणि सोमनाथ सूर्यवंशींच्या मृत्यूचा करणार निषेध 

ईव्हीएमविरोधात उत्तम जानकरांचं आजपासून दिल्लीच्या जंतरमंतरवर आंदोलन, मात्र दिल्ली पोलिसांकडून आंदोलनाला अद्याप परवानगी नाही  

निवडणूक आयोगाविरोधात काँग्रेस आक्रमक, राज्यभर जिल्हा आणि तालुका स्तरावर आंदोलन, काँग्रेसचे आजीमाजी आमदार, खासदार, पदाधिकारी आणि कार्यकर्ते होणार सहभागी

ठाकरेंच्या शिवसेनेचं आज राज्यभरात संविधान आणि भारतमातेचं पूजन, राज्याच्या प्रत्येक तालुक्यात वाजतगाजत मिरवणूक, सेना भवनात उद्धव ठाकरेंच्या हस्ते होणार पूजन

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram