ABP Majha Marathi News Headlines TOP Headlines

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स 4PM टॉप हेडलाईन्स 4PM 30 July 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक, नेमबाज मनू भाकर-सरबजोत जोडीने केली पदक कमाई, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय

अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, धमक्यांना भीक घालत नाही, मिटकरींची प्रतिक्रिया

वरळीत ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा,  जांबोरी मैदानातील अनधिकृत बांधकामावरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर

मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या प्रतिनिधींची उद्धव ठाकरेंसोबत मातोश्रीवर चर्चा...आता पवार, शिंदे, फडणवीस, अजितदादांच्या घरासमोर आंदोलनाचा इशारा...

चित्रा वाघ यांनी घरात भांडणं लावली, आरोप करत विद्या चव्हाणांनी ऐकवल्या वाघ यांच्या ऑडिओ क्लिप, तर झाकलेली मूठ उघडायला लावू नका नाहीतर पवारांना त्रास होईल, वाघ यांचा चव्हाणांना इशारा

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram