ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM TOP Headlines 7.00AM 05 February 2025
ABP Majha Marathi News Headlines 7.00 AM TOP Headlines 7.00AM 05 February 2025
राज्याच्या तिजोरीत खडखडाट, शिवभोजन थाळीसह अनेक लोकप्रिय योजनांना ब्रेक लागण्याची भिती, तब्बल एक लाख कोटींची वित्तीय तूट भरुन काढण्याचं आव्हान, लाडकी बहिणमुळे वाढा बोजा..
मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या मेघदूत निवासस्थानी नीति आयोगाचे सीईओ सुब्रमण्यणम यांच्यासोबत बड्या उद्योगपतींची बैठक.. स्वतः मुख्यमंत्र्यांसह विविध खात्याचे वरीष्ठ प्रशासकीय अधिकारीही बैठकीत
संतोष देशमुख हत्या प्रकरणावरुन फडणवीसांची तंबी...यापुढे असे प्रकार खपवून घेतले जाणार नसल्याचं बीडच्या आष्टीत वक्तव्य...बीडचा गौरवशाली इतिहास पुढे नेण्याचंही आवाहन...
काही ठराविक राजकारण्यांनी गुंडगिरीला पाठबळ दिल्यानं बीडची बदनामी, देवेंद्र फडणवीस यांच्यासमोर सुरेश धस यांचं वक्तव्य...संतोष देशमुख प्रकरणात फडणवीसांनी कणखर भूमिका घेतल्याचं केलं कौतुक...
महाराजांबद्दल वादग्रस्त वक्तव्य करणारा अभिनेता राहुल सोलापूरकर औरंगजेबाची औलादच..तर सोलापूरकरवर देशद्रोहाचा गुन्हा दाखल करा आणि अशा प्रवृत्तीच्या लोकांना वेळीच ठेचा, खासदार उदयनराजे भोसलेंचा संताप
ठाण्यातील जनता दरबाराच्या आयोजनामुळे चर्चेत आलेल्या पालघरचे पालकमंत्री गणेश नाईकांकडे संपर्कमंत्री म्हणून ठाण्याची जबाबदारी.. आता कुठेही जनता दरबार घेण्याची मोकळीक असल्याचाही नाईकांचा दावा