ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025
सकाळी ६.३० च्या हेडलाईन्स- ABP Majha Marathi News Headlines 630AM Headlines 630 AM 14 January 2025
बाळासाहेब ठाकरें स्मारकाच्या अध्यक्षपदावरुन उद्धव ठाकरेंना हटवण्याच्या हालचाली, शिंदेंच्या शिवसेनेकडून प्रस्तावाला मंजुरी, प्रस्ताव मंजुरीसाठी लवकरच मुख्यमंत्र्याकडे
संतोष देशमुख हत्या प्रकरणाच्या तपासासाठी नव्या एसआयटीची स्थापना... बसवराज तेलीच अध्यक्ष... आधीच्या एसआयटीवर देशमुख कुटुंबीयांनी घेतला होता आक्षेप...
केजमध्ये सीआयडी अधिकाऱ्यांशी धनंजय देशमुखांची चर्चा.. आज दुपारी बसवराज तेलींना भेटून घेणार माहिती.. मस्साजोगच्या ग्रामस्थांना सामूहिक आत्मदहन आंदोलन एक दिवस पुढे ढकललं
खंडणीप्रकरणी जेलमध्ये असलेल्या वाल्मिक कराडची पुण्यात पंचवीस कोटींची प्रॉपर्टी असल्याची माहिती.. लवकरच ईडी आर्थिक व्यवहाराची चौकशी करण्याची शक्यता.
. वाल्मिक कराडची सीआयडी कोठडी आज संपणार, १३ दिवसांपासून सुरु असलेल्या चौकशीनंतर कराडला आज केज कोर्टात हजर
मुख्यमंत्री फडणवीस आज पानिपत शौर्यभूमीला भेट देणार, मराठा सैन्याच्या शौर्याला करणार वंदन