ABP Majha Marathi News Headlines 08 pm TOP Headlines 08 pm 28 December 2024

Continues below advertisement

ABP Majha Marathi News Headlines 08 pm TOP Headlines 08 pm 28 December 2024

धनंजय मुंडेंची मंत्रिमंडळातून हकालपट्टी केल्याशिवाय निपक्षपणे तपास शक्य नाही, बीडमधल्या मोर्चात सर्वपक्षीयांचा सूर, देवेंद्र फडणवीस आणि अजितदादांच्या भूमिकेकडे लक्ष

सरपंच हत्या प्रकरणात नावं समोर आलेल्यांना तात्काळ अटक करा, बीडच्या मोर्चातून जरांगेंची मागणी, तर छत्रपती घराणं बीडचं पालकत्व स्वीकारण्यास तयार, संभाजीराजेंची घोषणा

सुरेश धस यांच्याकडून वैयक्तिक स्वार्थासाठी महिला कलाकार टार्गेट, अभिनेत्री प्राजक्ता माळीकडून सुरेश धस यांच्याविरोधात महिला आयोगाकडे तक्रार, पत्रकार परिषदेत अश्रू अनावर

बीड हत्या प्रकरणातील फरार आरोपींची संपत्ती जप्त करा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे सीऐआयडी पथकाला आदेश...बंदुकीसोबत फोटो असणाऱ्याचे परवाने रद्द करण्याच्याही सूचना...

संतोष देशमुख प्रकरणातील ३ आरोपींची कर्नाटकात हत्या झाल्याचा संशय दमानियांकडून व्यक्त,  व्हॉईस मेसेज व्हायरल करत पोलिसांकडे तक्रार

प्रकाश आंबेडकर आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यातील बैठकीत परभणीच्या हिंसाचारावर चर्चा...सोमनाथ सूर्यवंशीच्या कुटुंबीयांना एक कोटी नुकसान भरपाई देण्याची मागणी...

 

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram