ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 01 September 2024
ABP Majha Marathi News Headlines 04 PM TOP Headlines 04 PM 01 September 2024
यवतमाळ हिंगोली सह परभणी मध्ये तुफान पाऊस, वर्धा नदीलापूर तर पैनगंगा नदीन धोक्याची पातळी ओलांडली, मराठवाडा आणि विदर्भाला जोडणाऱ्या दनोडापूल पाण्याखाली.
हिंगोली जिल्ह्यामध्ये पूर परिस्थिती, बाजारपेठेसह नागरिकांच्या घरामध्ये शिरल पाणी, जनजीवन विस्कळीत. नांदेडचा प्रसिद्ध सहस्त्र कुंड धबधबा सुरू तिन्ही धारांना अक्राळ विक्राळ रूप, परभणी मध्ये देखील पहाटेपासून मुसळधार पाऊस.
पोलिसांच्या परवानगीची परवा न करता महाविकास आघाडीच जोडेमारो आंदोलन. गेटवे ऑफ इंडिया वरती शरद पवार, उद्धव ठाकरे, नाना पटोले यांच्याकडून सरकार वरती कडाडून टीका.
मध्यप्रदेश मध्ये छत्रपती शिवारायांचा पुतळा पाडला, कर्नाटक मध्ये पुतळा हटवला तेव्हा उद्धव ठाकरे का मुघ गिळून बसले होते? फडणविसांचा सवाल, काँग्रेसन चुकीचा इतिहास शिकवल्याचा आरोप.
छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा पडला पण महाराष्ट्रामध्ये दंगली कशा झाल्या नाहीत? चंद्रकांत खैरे यांच बादग्रस्त वक्तव्य. मुख्यमंत्री म्हणाले, हा तर महाराष्ट्र. अशांत करण्याचा प्रयत्न.
संभाजीनगर, दादर, नागपूर, सोलापूर मध्ये भाजपचही महाविकास आघाडीला प्रत्युत्तर आंदोलन, तर बडे नेते आंदोलनापासून दूरच, सर्वच नेत्यांनी माफी मागितली तर आंदोलन कशाला? असा बावनकुळेंचा सवाल.
महायुतीच जागा वाटप 10 दिवसांमध्ये जाहीर करणार चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती. 13 छोट्या मित्र पक्षांचाही विचार होणार जिंकेल त्याला जागा हे महायुतीच सूत्र
भाजपा आणि संघ नेत्यांच्या बैठकांवरती बैठका आज छत्रपती संभाजीनगर आणि मुंबई मध्ये दोन स्वतंत्र बैठका संभाजीनगरच्या बैठकीमध्ये फडणवीस आणि रावसाहेब दानवे ही सहभागी.
मनोज जरांगे सिंधुदुर्ग मधल्या मालवण मध्ये दाखल मालवण रॉक गार्डन ते राजकोट किल्ल्यापर्यंत रॅली. जरांगेंनी किल्ल्याची केली पाहणी.