ABP Majha Marathi News Headlines 08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स  08 PM TOP Headlines 08 PM 09 December 2024

'एक देश, एक निवडणूक' विधेयक येत्या हिवाळी अधिवेशनात मांडणार असल्याची माहिती...एकमतानं विधेयक मंजुरीसाठी केंद्र सरकारचे प्रयत्न...

विधानसभा अध्यक्षपदी राहुल नार्वेकरांची बिनविरोध निवड...पुन्हा येईन असं न म्हणताही परत आलात, फडणवीसांची टोलेबाजी...तर,  नार्वेकरांसाठी अध्यक्षद रिक्त करणाऱ्या पटोलेंचे आभार, एकनाथ शिंदेंचाही टोला... 

विधान परिषदेच्या सभागृह नेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड, एबीपी माझाच्या बातमीवर शिक्कामोर्तब...शिंदे सरकारमध्ये नंबर दोन...

विधानसभा विरोधी पक्ष नेते पदाबाबत निर्णय आता हिवाळी अधिवेशनात...पदासाठी विरोधकांचा विधानसभा अध्यक्षांकडे प्रस्ताव...१८ डिसेंबर रोजी कामकाज सल्लागार समितीची बैठक...

फडणवीस सरकारचा विश्वासदर्शक ठराव मंजूर...उदय सामंतांसह, दिलीप वळसे-पाटील, संजय कुटे, रवी राणांनी मांडलेला ठराव आवाजी मतदानाने मंजूर..

राज्य मंत्रिमंडळ विस्तार १४ डिसेंबरला होण्याची दाट शक्यता... मुख्यमंत्री फडणवीस शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत चर्चा करून मंत्रिपदाबाबत अंतिम तोडगा काढणार..

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram