ABP Majha Marathi News Headlines 10AM TOP Headlines 10 AM 24 October 2024

Continues below advertisement

आदित्य ठाकरे, जितेंद्र आव्हाड, जयंत पाटील, हर्षवर्धन पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडेंसह विविध पक्षांचे उमेदवार आज भरणार उमेदवारी तर अर्ज भरण्यापूर्वी चंद्रकांत पाटलांचं पुण्यात देवदर्शन

अनेक उमेदवार शक्तिप्रदर्शनासह भरणार अर्ज,  सर्वाधिक उमेदवार एकाच दिवशी अर्ज भरणार असल्याने मोठ्या शहरात वाहतूक कोंडीची भीती 

कवठेमहांकाळ मतदारसंघात मोठी राजकीय उलथापालथ, भाजपचे माजी खासदार संजयकाका पाटील अजित पवारांच्या राष्ट्रवादीत, रोहित पाटलांविरोधात स्वत: रिंगणात

काँग्रेसची ५२ ते ५४ उमेदवारांची पहिली यादी आज, विजय वडेट्टीवार यांची माहिती, काँग्रेस १०० ते १०५ जागांवर लढणार असल्याचाही पुनरुच्चार

ठाकरेंच्या शिवसेनेची पहिली यादी जाहीर...कोपरी-पाचपाखडीतून मुख्यमंत्री शिंदेंविरोधात केदार दिघे, तर वांद्रे पूर्वमधून वरुण सरदेसाईंना संधी...

धाराशिवमधील परांड्यातून रणजीत ज्ञानेश्वर पाटलांचा पत्ता कट, सामनातील यादीत शिक्कामोर्तब, शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे राहुल मोटे यांना उमेदवारी मिळण्याची शक्यता

 

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram