ABP Majha Marathi News Headlines 5PM TOP Headlines

Continues below advertisement

एबीपी माझा हेडलाईन्स 05 PM टॉप हेडलाईन्स 05 Pm टॉप हेडलाईन्स 30 july 2024

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारताला दुसरं कांस्य पदक, नेमबाज मनू भाकर-सरबजोत जोडीने केली पदक कमाई, एकाच ऑलिम्पिकमध्ये दोन पदकं जिंकणारी मनू भाकर पहिली भारतीय

अकोल्यात मनसे कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीचे नेते अमोल मिटकरींची गाडी फोडली, राज ठाकरेंवर केलेल्या टीकेमुळे मनसैनिक आक्रमक, धमक्यांना भीक घालत नाही, मिटकरींची प्रतिक्रिया

वरळीत ठाकरे गट आणि मनसे कार्यकर्त्यांमध्ये राडा,  जांबोरी मैदानातील अनधिकृत बांधकामावरुन दोन्ही पक्षांचे कार्यकर्ते भिडले

मराठा आरक्षण देण्याचा अधिकार राज्य सरकारला नाहीच, मोदींनीच तोडगा काढावा, पाठिंबा देऊ, उद्धव ठाकरेंकडून भूमिका जाहीर

आपल्या सुनेचे कान चित्रा वाघ यांनी भरले, विद्या चव्हाणांचा आरोप, तर मुलगा पाहिजे म्हणून चव्हाण कुटुंबीयांकडून सुनेचा छळ, वाघ यांचा प्रत्यारोप 

नाव आणि वेश बदलून दिल्लीवारी करताना अजितदादांनी सुरक्षेचे नियम धाब्यावर बसवले का, सुप्रिया सुळेंचा सवाल, एअरलाईनलाही जाब विचारणार

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram