ABP Majha Marathi News Headlines 06 PM TOP Headlines

Continues below advertisement

एबीपी माझा मराठी न्यूज हेडलाईन्स 06 PM टॉप हेडलाईन्स 06 PM 31 July 2024

मध्य रेल्वेची लोकलसेवा विस्कळीत, चुकीच्या सिग्नलमुळे मालगाडी मध्येच अडकली, बदलापूर-कर्जत दरम्यान रेल्वे वाहतूक ठप्प 

तू राहशील नाहीतर मी राहीन, विधानसभेच्या पार्श्वभूमीवर फडणवीसांचं नाव घेत उद्धव ठाकरेंचा इशारा, तर जेलमध्ये टाकण्यासाठी अनेक कट रचल्याचाही आरोप

प्रचाराला याच, विधानसभेत उरली सुरली गुर्मीही उतरवू, उद्धव ठाकरेंचा मोदींवर हल्लाबोल, तर ठाकरेंचं आव्हान स्वीकारत भाजप नेत्यांचा पलटवार

सत्तेत आल्यावर MMRDA बंद
करणार, उद्धव ठाकरेंचं विधान, मुंबईसाठी बीएमसी पुरेशी असल्याचं मत

पूजा खेडकरला UPSCचा सर्वात मोठा दणका,  दोषी ठरवत उमेदवारी रद्द, भविष्यात कुठलीही सरकारी परीक्षा देता येणार नाही , माझाच्या बातमीचा सर्वात मोठा इम्पॅक्ट

अजित पवारांना बनावट कागदपत्रांद्वारे सोडण्यासाठी सीआरपीएफला अमित शाहांच्या सूचना होत्या, संजय राऊत यांचा थेट आरोप, अजित डोवाल यांचाही कटात सहभाग, राऊतांचं वक्तव्य

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस चांदा ते बांदा यात्रा काढणार. ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात चंद्रपूरमधून यात्रेला होणार सुरुवात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram